स्पष्ट बहुमत नसल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली
फुलंब्री, (प्रतिनिधी) फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीनंतर सभापती कोण होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
गणांच्या पंचायत समितीत कोणत्याही ३ राजकीय घडामोडींना २ वेग आला आहे. जिल्हा परिषद गटांपैकी तीन गटांत काँग्रेस पवार) गटाने विजय मिळवला. मात्र पंचायत समितीच्या आठ गणांमध्ये विखुरलेला निकाल लागल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी किमान पाच सदस्यांची गरज आहे.
-- तुझं माझं जमेना, १ तुझ्यावाचून करमेना --
सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापता येत नाही. भाजपचे तीन सदस्य असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन सदस्य साथ दिल्यास भाजपला बहुमत गाठता येईल. मात्र पाल गणातील निवडणुकीपूर्वीच्या अंतर्गत वादामुळे शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे), शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यास त्यांचेही तीन सदस्य होतात. त्यांना आणखी दोन सदस्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्ष किंवा इतर गटातील सदस्यांच्या भूमिकेवरही समीकरणे अवलंबून राहणार आहेत.
-- प्रशासक काळातील कारभार पुन्हा चर्चेत ? --
मागील कार्यकाळात पंचायत समितीवर प्रशासक नेमण्यात आला होता. पानंद रस्ते, वैयक्तिक लाभाच्या विहिरी, मनरेगा कामांतील कथित गैरव्यवहार यांसारख्या मुद्द्द्यांवर पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर आला होता. विविध आंदोलने, चौकशा आणि आरोप प्रत्यारोप यामुळे तालुक्यातील राजकारण तापले होते. नव्या सभापतीसमोर पारदर्शक कारभाराचे मोठे आव्हान असेल, अशी चर्चा आहे. सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार, आमदार आणि स्थानिक नेते आपल्या पक्षाचा सभापती विराजमान करण्यासाठी डावपेच आखत आहेत. अंतिम सत्ता समीकरण काय ठरते, याकडे फुलंब्री तालुक्याचे लक्ष लागले आहे.










